'नाणार'चं काम रोखू नका, अन्यथा...; शिवसेनेच्या आमदाराला फोनवरून धमकी

रत्नागिरी: कोकणातील राजापूर तालुक्यातील बहुचर्चित प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांबरोबर विरोध करणारे राजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार यांना अज्ञाताने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात आमदार साळवी यांनी तक्रार दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून ही धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा' अशी धमकी फोनवरून आमदार साळवी यांना देण्यात आली. त्यानंतर समोरील अज्ञात व्यक्तीने फोन कट केला. याबाबत आमदा साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजापूर मतदारसंघात ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. आमदार साळवींचाही स्थानिकांसमवेत या रिफायनरीला विरोध आहे. १० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास साळवी यांना अज्ञाताने फोन केला. 'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा', अशी धमकी फोनवरून देण्यात आली. तर त्याच दिवशी रात्री सव्वाअकराच्या सुमारास साळवी यांना पुन्हा फोन आला. ‘रिफायनरी में हमारा पैसा लगा हुआ है, विरोध मत करना, नही तो...', अशी धमकी समोरील व्यक्तीने त्यांना दिली. या प्रकरणी साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3I7FJ54
https://ift.tt/3FwODaK
No comments