अभिमानास्पद! प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात सहभागी होणार चिपळूणची लेक

प्रसाद रानडे | : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होण्याचा मान रत्नागिरीतील चिपळूणच्या विद्यार्थिनीला मिळाला आहे. असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. दिशा ही चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेतेय. तिच्या निवडीने महाविद्यालयाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. दिशा डीबीजे महाविद्यालयात विज्ञान शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच योगासने व कराटे यामध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक भान, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अंगभूत असलेल्या कला-कौशल्य या गुणांना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच मार्गदर्शनाचा उपयोग दिशालाही झालाय. कराटेमध्ये तिने ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. या सर्व कला जोपासल्याने मला यंदा राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून २६ जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभाही होण्याचा सन्मान मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया दिशा पातकरने दिली. येथील डीबीजे महाविद्यालयामध्ये 'राष्ट्रीय सेवा योजना'च्या (एनएसएस) माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये दिशाचा सक्रिय सहभाग असतो. राजपथावर संचलनात सहभागी होण्याची संधी 'एनएसएस' मधून मिळते. त्यासाठी दिशाने प्रयत्न सुरू केले होते. दिशाची १९ महाराष्ट्र बटालियन कराड येथे दोन कॅम्पमध्ये, कोल्हापूरमध्ये दोन कॅम्पमध्ये, तर पुणे येथे पाच कॅम्पमध्ये निवड झाली होती. महाराष्ट्रातून एकूण एक लाख कॅडेड्समधून ५७ जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये २३ मुली व ३४ मुलांची निवड राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसह, शारीरिक क्षमता सिद्ध केली. त्यामुळेच त्यांना संधी देण्यात आली आहे. दिशाला डीबीजे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. मधुसुदन माने, प्राचार्य संजय गव्हाणे व तिच्या पालकांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या निवडीबद्दल तिच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिशाची ही निवड डीबीजे महाविद्यालय आणि चिपळुणकरांसाठी अभिमानास्पद आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3fWTAPK
https://ift.tt/3H3XuCm
No comments