वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.

The post वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on The GNP Marathi Times.



from मुंबई बातमी – Mumbai News – The GNP Marathi Times https://ift.tt/3GfgGff
https://ift.tt/3rKIF0M

No comments

Powered by Blogger.