गोव्यात गुप्त गाठीभेटी, नारायण राणेंचा कट्टर समर्थक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले भाजप जिल्हाध्यक्ष यांनी विरोधी पक्षनेते यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राजन तेली () आणि देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रात्री उशीरा गोव्यात भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस () यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगितले. राजन तेली यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. मी कोणावरही नाराज नाही, वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत आहे. जेणेकरुन नव्या लोकांना काम करण्याची संधी मिळेल, असे राजन तेली यांनी म्हटले होते. त्यानंतर राजन तेली भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राजन तेली यांची गोव्यातील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राजन तेली यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्गात पक्ष आणि संघटनावाढीसाठी भाजपला तु्मची गरज आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, असे फडणवीस यांनी राजन तेली यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे आता राजन तेली आपला राजीनामा मागे घेणार की आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुशांत नाईक यांनी राजन तेली यांना पराभवाचा धक्का दिला. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत. वैभव यांनीच विधानसभा निवडणुकीत २०१४मध्ये यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बॅंक नसल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या आधी ते दोनदा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रीक केल्याचे स्पष्ट झाले. 'महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली की राजन तेलींची वर्णी लागेल' सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे पॅनल हे राजन तेली यांच्या नेतृत्त्वाखाली लढत होते. मात्र, या निवडणुकीत राजन तेली यांचा पराभव झाला. या पराभवानंतर राजन तेली यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. याविषयी नारायण राणे यांना पत्रकारपरिषदेत विचारण्यात आले होते. त्यावेळी राणे यांनी म्हटले की, राजन तेली यांच्याबाबतीत गड आला पण सिंह गेला, अशी गत होऊ देणार नाही. भाजप असे राजकारण करते की गड आणि सिंह दोन्ही राखते. इथून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता आहे. त्यामळे आम्ही राजन तेली यांची वर्णी कुठेतरी नक्की लावणार, असे नारायण राणे यांनी म्हटले.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3mSzutD
https://ift.tt/3eI6YGz

No comments

Powered by Blogger.