नितीन गडकरींचे 'आदेश' आले अन् शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे मुंबई-गोवा महामार्गावरील आंदोलन स्थगित झाले

प्रसाद रानडे| रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राज्यातील , आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकारी लेखी आश्वासन देणारे पत्र घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ९० किलोमीटरचे रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते महामार्गावर जमले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकारी पत्र घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. ३१ जानेवारीपर्यंत काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सावंत यांनी यासंबंधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर अधिकारी पत्र घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. या आंदोलनात खासदार विनायक राऊत, उदय सामंत, आमदार शेखर निकम, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गडकरी यांचे आदेश घेऊन अधिकारी पोहोचले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केल्यानंतर त्याची गडकरी यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रस्त्याचे काम ३१ जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. यासंबंधी उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाचा दोनच दिवसांपूर्वी इशारा दिला होता. त्यानंतर केंद्रातील अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तीन-चार वर्षांपासून हे रस्त्याचे काम रखडले होते. अधिकारी लेखी आश्वासन देणारे पत्र घेऊन आले. त्यांनी त्यात नितीन गडकरी यांचाही उल्लेख केला आहे. त्यांनी आदेश दिल्यानंतर आल्याचे सांगितले. रस्त्याचे काम रखडण्यास ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका गडकरी यांनी घेतली आहे, असे सामंत यांनी सांगितले. या रस्त्याचे काम मे-जून २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हा रास्ता रोको संयमाने करण्यात आला. जर काम वेळेत झाले नाही तर, रत्नागिरीत यापेक्षा मोठे आंदोलन बघायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3rdRDoB
https://ift.tt/35itPak
No comments