nitesh rane case chronology : नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, आतापर्यंतच्या घटनाक्रमावर एक नजर

मुंबई: शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणात यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज, गुरुवारी फेटाळण्यात आला. मात्र, जामीन अर्ज फेटाळतानाच, त्यांना १० दिवस अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर व्हावे आणि जामीन अर्ज दाखल करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व अर्ज दाखल केला होता. मात्र, तिथेही राणेंना दिलासा मिळू शकला नव्हता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज, गुरुवारी त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना दहा दिवसांत हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर एक नजर... काय काय घडलं? १८ डिसेंबर २०२१ : सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल आणि चार जणांना अटक १९ डिसेंबर २०२१ : चारही आरोपींना कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाकडून २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी २० डिसेंबर २०२१ : आणखी एका आरोपीला अटक आणि कोर्टाकडून २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी २३ डिसेंबर २०२१ : सर्व पाच आरोपींना पुन्हा कोर्टात केले हजर, २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ २४ डिसेंबर २०२१ : नितेश राणे व संदेश सावंत यांची कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी आणि जबाब २५ डिसेंबर २०२१ : अटकेत असलेल्या पाच आरोपींना कोर्टाकडून ६ जानेवारी २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी २६ डिसेंबर २०२१ : आणखी एका आरोपीला अटक आणि कोर्टाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी २६ डिसेंबर २०२१ : नितेश राणे व संदेश सावंत यांची अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टात धाव ३० डिसेंबर २०२१ : सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला ३ जानेवारी २०२२ : राणे व सावंत यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव ३ जानेवारी २०२२ : अर्जावरील सुनावणी प्रलंबित राहिल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कठोर कारवाई करणार नसल्याची पोलिसांची हायकोर्टात हमी १३ जानेवारी २०२२ : हायकोर्टातील सुनावणी पूर्ण, हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात राणे व सावंत यांचा सहभाग असल्याचे पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा; तर सत्ताधाऱ्यांच्या सूडबुद्धीने गोवण्यात आल्याचा दोघा अर्जदारांचा दावा १७ जानेवारी २०२२ : मुंबई हायकोर्टाने राणे व सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, २७ जानेवारीपर्यंत कारवाई होणार नसल्याची पोलिसांची हायकोर्टात हमी २७ जानेवारी २०२२ : सुप्रीम कोर्टाकडून राणे व सावंत यांना अटकपूर्व जामीन नाही, दहा दिवसांचे संरक्षण देऊन सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टात शरण जाण्याचे निर्देश देऊन नियमित जामीन मिळवण्याची केली सूचना


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3rYvU2Q
https://ift.tt/3AyLkil

No comments

Powered by Blogger.