अरेरे! दम्याच्या आजाराला आजोबा कंटाळले, म्हणाले पाय मोकळे करुन येतो अन् धरणावर जाऊन....

रत्नागिरी: रत्नागिरीच्या तालुक्यातील पालगड रोहिदासवाडी येथील गोविंद धयाळकर (वय ८५) या वृद्धाचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. गोविंद धयाळकर शनिवारी रात्री आपल्या घरातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत. त्यानंतर जवळच्याच धरणात त्यांचा मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला. गोविंद धयाळकर हे दम्याच्या आजाराने त्रस्त होते. ८ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास “मी पाय मोकळे करून येतो”,असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ ते घरी परतले नाहीत, त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. अखेर ९ जानेवारीला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोंडेघर धरणाच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार चव्हाण करत आहेत. from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3FdsrSz
https://ift.tt/3ngvW4B

No comments

Powered by Blogger.