कोकणातील मिनी महाबळेश्वर दापोलीत हुडहुडी; तापमानात ९.२ अंशांपर्यंत घसरण
रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी जिल्हयात दापोली शहर परिसर 'मिनी महाबळेश्वर'म्हणून ओळखले जाते. गेले दोन दिवस येथे कडाक्याची थंडी पडली आहे. यावर्षी ११ जानेवारी रोजी पारा सर्वात कमी म्हणजेच ९.२ अंशावर आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागाती गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर यावर्षी ११ जानेवारी ही नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी ८ पासून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यत झालेल्या चोवीस तासातील ही नोंद आहे. आठवड्यापूर्वी हे तापमान ११ अंशावर आले होते. यावर्षी पडत असलेल्या थंडीमुळे पर्यटक उत्साहात असले तरी अवेळी पडलेला पाऊस आंबा बागायतदारांची चिंता वाढवणारा आहे. दापोलीत पडत असलेल्या गुलाबी थंडीमुळे पर्यटकांची गर्दी वाढणार असून यंदाचा थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठया संख्येने पर्यटक दाखल झाले होते. दापोली शहर हे समुद्रसपाटीपासून २५० मीटर उंचीवर वसलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. त्यामुळे हे कोकणातील मिनी महाबळेश्वर असल्याच म्हटले जाते. एवढ्या उंचीवर असूनही तरी अवघ्या ७ ते ८ किमीवर समुद्र किनारा आहे. या सगळ्या वैशिष्ट्यपुर्ण भौगोलिक रचनेमुळे ब्रिटिशांनीही दापोली शहराची निवड 'कँम्प' साठी केली होती. दापोली शहरातील वाढते शहरीकरण व उभी राहणारि सिमेंट काँक्रीटची जंगले यातही दापोलीचे मिनी महाबळेश्वरपण टिकून आहे. मुंबई, ठाण्यात यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी तापमानाची नोंद मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत तर सोमवारी यंदाच्या हिवाळय़ातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि परिसरात सध्या रात्री आणि दिवसाही गारवा जाणवतो आहे. दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. मुंबईच्या कुलाबा केंद्रावर १५.२ अंश किमान, तर २५.७ अंश कमाल तापमान नोंदविले गेले. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४.४ अंशांनी, तर कमाल तापमान ४.८ अंशांनी कमी आहे. सांताक्रुझ केंद्रावर १३.२ अंश किमान, तर २५.१ अंश कमाल तापमान होते. ते अनुक्रमे ४.३ आणि ६.१ अंशांनी सरासरीच्या तुलनेत कमी आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3f7XWDc
https://ift.tt/33o8NGd
No comments