संतापजनक! पहिलीतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; संशयित शिक्षकाची पोलीस कोठडीत रवानगी

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्हयात एका शिक्षकानेच पहीलीतील विद्यार्थिनीजवळ अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी पुढे आला. रत्नागिरी तालुक्यातील एका गावातील प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. शिक्षकानेच पहिलीतील मुलीजवळ अश्लील चाळे केल्याप्रकरणी या संशयित शिक्षकाला रत्नागिरी ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याप्रकरणी संबंधित गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका संताप व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री उशिरा या संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर केले असता रविवारी न्यायालयाने एक दिवसाच्या पोलिस कोठडीत या शिक्षकाची रवानगी केली आहे. संशयित रमेश जाधव हा ५० वर्षीय वयाचा असलेला हा शिक्षक संगमेश्वरमध्ये राहणार आहे. काही वर्षांपूर्वी त्याने असे कृत्य केले असल्याची माहिती पुढे येत आहे. पालकांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तात्काळ दखल घेत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी शिक्षकाला शनिवारी रात्री अटक केली होती. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3Ka4WxI
https://ift.tt/3ne8iWi
No comments