Ratnagiri Theft : मंदिरात झाली होती चोरी; सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर धक्कादायक माहिती उघड

रत्नागिरी: जिल्ह्यातील () तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे हद्दीतील उसगाव येथील श्री खंडोबा म्हाळसाई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने दहा हजारांची रोकड लंपास केली होती. याआधीही या मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उसगावातील श्री खंडोबा म्हाळसाई झाली होती. ४ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या पथकाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. पोलिसांनी तपास करून संशयित आरोपीला जेरबंद केले. याबाबत दत्ताराम लक्ष्मण सावरकर यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही उसगावच्या या मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, चोरट्याचा शोध लागू शकला नव्हता. प्रभारी निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी आणि त्यांच्या पथकाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या परिसरातून गोपनीय माहिती मिळवली. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताचा फोटो मिळवून त्याच्याबाबत उसगाव ग्रामस्थांकडून माहिती मिळवली. संशयित चोरटा हा गावातील असल्याचे उघड झाले. राजेंद्र धोपट (वय ५५) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रोकड हस्तगत संशयित चोरट्याला अटक करून त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तत्पूर्वी, संशयित आरोपीकडून ८,३५६ रूपये हस्तगत केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ व त्यांचे सहकारी आर. बी. मोहिते, एस. आर. शिंदे, महिला पोलीस नाईक आर. एन. डोले, एस. बी. कांबळे, जानवलवकर, कोळथरकर, देशमुख यांनी केली. चोरीच्या घटनेच्या तपासात दाभोळ पोलिसांना उसगावचे सरपंच चेतन रामाणे व ग्रामस्थांनी सहकार्य केले.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3n9eMWB
https://ift.tt/3zKqsUP

No comments

Powered by Blogger.