आंबा बागेकडे जाताना दुचाकीचा टायर फुटला; पुढे जे काही घडलं ते भयंकर...

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर येथे दुचाकीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महेश करंदीकर (वय ३०, रा. राजापूर) असे तरूणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पावणेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. महेश हा राजापुरातील हॉटेल मालक अशोक करंदीकर यांचा मुलगा आहे. त्याच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महेश यांच्या अपघाताचे वृत्त कळताच अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात तातडीने धाव घेतली. महेश हा आपली दुचाकी घेऊन मित्र वैभव धर्माधिकारी याच्यासोबत राजापूरकडून सिंधुदुर्गकडे पोंबुर्ले येथे आपल्या बागेकडे जात होता. कोंडये येथे त्याच्या दुचाकीचा टायर फुटला व हा अपघात झाला. यात महेश याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सहकारी वैभव धर्माधिकारी हा किरकोळ जखमी झाला आहे. महेश हा होतकरू तरूण होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. हॉटेल व्यवसाय सांभाळण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघाटे करत आहेत. दुचाकीवरून खाली पडून महिलेचा मृत्यू शहराजवळ खेडशी तिठा येथे दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला होता. ममता मधुकर सावंत (वय ५३, रा. खेडशी बौद्धवाडी) या शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरातून खेडशी तिठा येथे पायी जात होत्या. यावेळी त्यांनी स्वप्नतेज कांबळे यांच्याकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर त्या दुचाकीवर मागे बसल्या. अंतर्गत रस्त्यावरून जात असताना ममता अचानक दुचाकीवरून खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सूर्वे करीत आहेत.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/OYB5rZE
https://ift.tt/NvIBTjz

No comments

Powered by Blogger.