स्वर्गीय स्वर लोपला! गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन 😢

मुंबई : भारतातीलच नव्हे तर अवघ्या जगातील संगीतप्रेमींच्या मनात रुंजी घालणाऱ्या स्वर्गीयस्वरांच्या सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना आठ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर मात करून त्या बऱ्या झाल्या. परंतु नंतर त्यांना न्युमोनिया झाला. तरीही त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या. दोनच दिवसांपूर्वी त्यांना लावण्यात आलेला व्हेंटीलेटर काढण्यात आला होता. परंतु शनिवारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे एकेक अवयव निकामी होत गेल्यामुळे रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यामुळे हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी, संगीतसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला या जमान्यातील सुविख्यात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायक पंडित दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील होते. त्यांना आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ अशी भावंडे आहेत ही सर्व भावंडे संगीतात अत्यंत निपुण आहेत. लताजीना दादासाहेब फाळके, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने त्यांच्या निधनानिमित्त दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत.

No comments

Powered by Blogger.