धक्कादायक! बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला, अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

रत्नागिरी: प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर नैराश्य आलेल्या अल्पवयीन मुलीनं टोकाचं पाऊल उचललं. तिनं अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यात ती गंभीररित्या होरपळली होती. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. रत्नागिरीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलगी मुंबईहून कोकणात लांजा परिसरात आपल्या मामाकडे आली होती. मुंबईत राहणाऱ्या तिच्या प्रियकराने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे नैराश्य आल्यानं तिनं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ज्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, त्याने लग्नास नकार दिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित मुलाविरोधात मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामाकडे आली होती मुलगी मुलीचे राहणाऱ्या २१ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. ही मुलगी ४ जानेवारी २०२२ रोजी कोकणातील रत्नागिरीत लांजा परिसरातील मामाकडे काही दिवसांसाठी राहायला आली होती. त्याचवेळी तिच्या प्रियकराने लग्नास नकार दिला. यामुळे नैराश्येतून तिने २७ जानेवारी २०२२ रोजी मामाच्या घरी असताना अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. या घटनेनंतर नातेवाइकांनी तिला सुरुवातीला लांजातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रग्णालयात नेण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलगी मुंबईतील वरळी परिसरात राहत होती. तिच्या वडिलांनी या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात माहिती दिली. या घटनेची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/CAbYr1O
https://ift.tt/6CK1Fi7
No comments