नितेश राणेंची कोर्टात सुनावणी; संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून नारायण राणे सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आमदार यांच्या पोलीस कोठडीची दोन दिवसांची मुदत आज संपत असताना नेमका काय निकाल लागतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे. काही वेळात नितेश राणे यांना कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ होते की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास ते जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात, या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले आहे. विशेष म्हणजे संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन सोडून जाणे हे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून कालपासून चौकशी सुरु आहे. आमदार राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची एकत्रित चौकशी करण्यात आली. त्यानंतर नितेश राणे यांची कणकवली पोलिसांनी साडेपाच तास चौकशी केल्यानंतर गोवा येथील नीलम बिट्स या हॉटेलमध्ये त्यांना नेले. तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली. याच हॉटेलमध्ये संतोष परब यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती मिळाल्याचे समोर आले होते. त्यानुसार, पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे, असे सांगितले जाते. नितेश राणेंच्या अटकेमुळे मला न्याय मिळाला: संतोष परब भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना झालेल्या अटकेनंतर शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राणे यांना अटक झाल्यामुळे मला न्याय मिळाला आहे. इतकेच नाही तर या अटकेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळाला आहे, असे संतोष परब यांनी म्हटले आहे. दहशत पसरवायची आणि निवडणुका जिंकायच्या हा राणे फॅमिलीचा डाव आहे. तो डाव नितेश राणे यांच्या अटकेने उधळला गेला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत दहशत पसरवून निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या दहशतीमुळे आमचे काही संचालक किरकोळ मतांनी पडले आहेत. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदा या हल्ला प्रकरणातील एक आरोपी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर बसला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे. तो नेहमी नितेश राणे यांच्या सोबत असतो. तो म्हणजे गोट्या सावंत. त्यालाही अटक झाली पाहिजे. आणि त्यानंतर या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे, असे संतोष परब यांनी म्हटले होते.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/xMTEYvj
https://ift.tt/hAIg9lk
No comments