Khed : एकुलत्या एक मुलीने उचलले टोकाचे पाऊल, आई-वडिलांना बसला मोठा धक्का

चिपळूण : जिल्ह्यात येथे एका १९ वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरूणीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एकुलत्या एक मुलीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुई (वय १९, राहणार. खेड सोनारआळी) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. ही घटना शनिवारी, १९ फेब्रुवारी रोजी घडली असून, या घटनेची नोंद दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महाविद्यालयात प्रथम वर्षात ती शिक्षण घेत होती. जुई हिने घरातील बेडरूममध्ये पंख्याला साडीने गळफास घेतला. तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुलीने आत्महत्या केल्याचे सर्वप्रथम तिच्या आईला समजले. या घटनेची माहिती शेजारी राहणारे स्वप्नील बनारे (वय ४१, रा. सोनारआळी ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली. आई-वडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने तिच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आपल्या वडिलांच्या सत्कार सोहळ्याला ती काही दिवसांपूर्वी गेली होती. काही दिवसांपासून ती आनंदीही दिसत होती. मात्र, असे असताना तिने स्वतःचे जीवन का संपवले यामागील कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मुसळे करत आहेत.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/pBnx31k
https://ift.tt/I2Jlsut

No comments

Powered by Blogger.