Ratnagiri News : समुद्रात बोटीवर मस्ती करणं बेतलं जीवावर, तोल गेला अन् खलाशी...

रत्नागिरी: मिरकरवाडा जेटीवर बोट नांगरून ठेवण्यात आली होती. त्या बोटीवर मस्ती करत असताना, तोल जाऊन समुद्राच्या पाण्यात पडलेल्या खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या खलाशाचा मृतदेह रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास सापडला. या घटनेची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. प्रदेश जगना चौधरी थारु (वय ३७, मूळ साडेपाणी कैलाली रा. नेपाळ. सध्या राहणार मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या क्रमांकाच्या जेटीवर हा मृतदेह आढळून आला. महम्मद अली अब्दुल सत्तार राजपूरकर (वय ३५, राहणार - खडप मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजता मिरकरवाडा जेटी येथे बोटीवर हा खलाशी मस्ती करत होता. त्यावेळी तोल जाऊन तो समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार पालांडे करत आहेत.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/ay7J4So
https://ift.tt/UynjAHN

No comments

Powered by Blogger.