Nitesh Rane: नितेश राणेंना मोठा दिलासा; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार यांना जामीन मंजूर केला आहे. हा नितेश राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. यापूर्वी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी कणकवली दिवाणी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करुन जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नितेश यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे समजते. दोषारोप पत्र दाखल होइपर्यंत नितेश राणे यांना कणकवलीत येण्यास बंदी असेल. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. नितेश राणे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप होता. याप्रकरणातील मुख्य आरोप सचिन सातपुते याचा नितेश राणे यांच्याशी संबंध असल्याचे अनेक पुरावे सरकारी पक्षाने सादर केले होते. त्यामुळे नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी भूमिगत व्हावे लागले होते. अखेर तीन आठवड्यानंतर नितेश राणे समोर आले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना १० दिवसांत आत्मसमर्पण करत नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी झालेल्या सुनावणीत नितेश राणे यांनी आत्मसमर्पण न केल्याने सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर दिवाणी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. नितेश राणे यांची तब्येत बिघडली संतोष परब हल्लाप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याची माहिती समोर येत आहे. नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरुवातीला त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. परंतु, त्याठिकाणी हदयरोग तज्ज्ञ नसल्याने नितेश राणे () यांना सोमवारी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. याठिकाणी आणल्यापासून नितेश राणे यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती आहे. नितेश राणे यांना काल रात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. त्यांना रात्रीपासून जवळपास तीनवेळा उलट्या झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय पथकाने आता नितेश राणे यांच्या सर्व तपासण्या करण्याचा निर्णय घेतला होता.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/4Q0UjTC
https://ift.tt/xyGuZrv
No comments