Nitesh Rane: नितेश राणे यांची तब्येत आणखीनच बिघडली, उलट्यांचा त्रास; न्यायालय जामीन देणार?
सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याची माहिती समोर येत आहे. नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरुवातीला त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. परंतु, त्याठिकाणी हदयरोग तज्ज्ञ नसल्याने नितेश राणे () यांना सोमवारी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. याठिकाणी आणल्यापासून नितेश राणे यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती आहे. नितेश राणे यांना काल रात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. त्यांना रात्रीपासून जवळपास तीनवेळा उलट्या झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय पथकाने आता नितेश राणे यांच्या सर्व तपासण्या करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला होता. यावर बुधवारी निकाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीत त्यांच्या प्रकृतीचा विचार होणार का, हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या छातीत दुखत आहे. त्यामुळे नितेश राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता वैद्यकीय तपासण्यांनंतर नितेश राणे यांना नक्की काय झाले आहे, हे समजू शकेल. रुग्णवाहिका थांबवून डॉक्टरांकडून उपचार नितेश राणे यांना सोमवारी उपचारासाठी सिंधुदुर्गाहून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. नितेश राणे यांना रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला नेले जात असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. रुग्णवाहिका रस्त्यात असतानाच नितेश राणे यांच्या छातीत अचानक वेदना व्हायला लागल्या. त्यामुळे तळेरेनजीक नितेश राणे यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांचा ताफा थांबवण्यात आला. याठिकाणी डॉक्टरांनी नितेश राणे यांना औषध दिले. त्यानंतर हा ताफा पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाला होता. नितेश राणे यांच्या जामिनावर आज निर्णय नितेश राणे यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. मात्र, न्यायालयाने जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे आज नितेश राणे यांच्या जामिनावर निर्णय दिला जाईल.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/RC6jUHA
https://ift.tt/dOKWHQD
No comments