नगरपंचायतींची निवडणूक 21 डिसेंबर रोजी होणार; आचारसंहिता लागू!
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यात असलेल्या 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक 21 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी केली आहे.
ते म्हणाले, राज्यातील एप्रिल 20 20 ते 20 21 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 20 21 मध्ये मुदत संपणाऱ्या 18 तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहा अशा एकूण 105 नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी 1 ते 7 डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी 8 डिसेंबर रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत होईल. आणि 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
No comments