खेड तालुक्यात 36 टक्के लसीकरण पूर्ण

खेड: तालुक्यातील  आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे व खेड नगरपरिषदेच्या दवाखान्याच्या माध्यमातून जवळपास ३६ टक्के लोकसंख्येचे  दोन्ही डोस देऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या १६५,४३४ असून यामध्ये लस देण्यासाठी आवश्यक १८ पेक्षा जास्त वयोगटातील १२०,८५४ लोकसंख्या आहे. सद्यस्थितीत जवळपास  ७४ टक्के म्हणजेच ८९५९९ नागरिकांनी लसीची  पहिली मात्रा घेतली आहे तर दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ४३३७५ एवढी आहे.  तालुक्यात यावर्षी जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना फ्रंटलाईन वर्कर्स व मार्च पासून सर्वसामान्य नागरिकांना कोवक्सिन व कोविशील्ड या दोन्ही कंपन्यांचे डोस उपलब्ध करून देण्यात आले. तालुक्यात तिसंगी, शिव बु, लोटे, वावे, आंबवली, फुरुस, कोरेगाव, तळे व खेड नगरपरिषद दवाखाना अशा एकूण ९ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू झाली आहेत. यामध्ये खेड शहरातील नागरिकांचे  सर्वात जास्त लसीकरण झाले असून सर्वात कमी लसीकरण फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावात आहे. नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तालुक्यातील विकलांग व अंथरुणावर खिळलेल्या , स्तनदा माता आणि गरोदर माता या विशेष गटातील १२२८ जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे तर ३७८ जणांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. यामध्ये १४३८ विकलांग व अंथरुणावर खिळलेल्या लोकसंख्येपैकी ३१७ नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे तर ८७९ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. ५९९ स्तनदा मातांपैकी ३४ मातांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. तसेच १९३ मातांनी पहिली मात्रा घेतली आहे. तालुक्यातील ७७९ गरोदर मातांपैकी १५६ महिलांना पहिला तर दोन्ही डोस घेणाऱ्या मातांची संख्या २७ आहे.
खेड शहराची लोकसंख्या १७०८३ असून यापैकी १२४७० नागरिक १८ पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. यामध्ये ७८३८ म्हणजेच ६२.८५ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १२०७५ आहे. तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात १३५८० लसीकरण योग्य लोकसंख्या असून ४३३१ जणांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. यामध्ये तिसंगी व नवसागर येथील शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तिसंगीची १८ पेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्या ९१३ असून नवानगर ची लोकसंख्या ९१ आहे. या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी दोन्ही डोस घेऊन शंभर टक्के लसीकरण मोहीम पूर्ण केली आहे. शिव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत केवळ २१.५२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १४८३१ लसीकरण योग्य लोकसंख्येपैकी ३१९२ जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लोटे आरोग्य केंद्रात सर्वात जास्त लसीकरण योग्य लोकसंख्या असून ३८.४६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. या केंद्रांतर्गत २०२५४ लोकसंख्या असून १४४८३ जणांनी पहिला डोस घेतला आहे तर ७७८९ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. वावे प्राथमिक आरोग्य केंद्रात ६९०० लसीकरण योग्य लोकसंख्येपैकी २८०४ जणांनी दोन्ही डोस पूर्ण झाले असून ६५८३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. आंबवली केंद्रांतर्गत ४५.३३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे तर १२७८१ जणांनी पहिला डॉस घेतला आहे. फुरुस आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या वेग मंद असून १८१९० लोकसंख्या असलेल्या या भागातील केवळ ३८८५ जणांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २९.६६ टक्के लोकसंख्या लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र एकूण लसीकरण योग्य ११०९० लोकसंख्येच्या १००२९ लोकसंख्या पहिला डॉस पूर्ण झाली आहे. तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात ९७.६६ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला असून ४०.६१ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. या केंद्रात ८९६६ लोकसंख्या लसीकरण योग्य आहे. या केंद्रांतर्गत वाडी जैतापूर या गावाची लोकसंख्या ९१ असून शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. 
--
100℅ लसीकरण 3 गाव वाडी जैतापूर, तिसंगी व नवानगर

No comments

Powered by Blogger.