खेडमध्ये २६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका
खेड:तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमधील रिक्त पदांची पोटनिवडणुक प्रक्रिया दिनांक २२ रोजी सुरू होत असून एक महिन्यानंतर ती संपणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. खेड तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार असून ग्रामपंचायत निहाय रिक्त असलेली पदे पुढीलप्रमाणे बहिरवली प्रभाग तीन - सर्वसाधारण स्त्री १, चौगुले मोहल्ला प्रभाग १ सर्वसाधारण स्त्,री १ व प्रभाग ३- नामाप्र, रजवेल प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १ व प्रभाग ३- सर्वसाधारण स्त्री १, सवणस बुद्रुक प्रभाग १- अनुसूचित जाती स्त्री १ व प्रभाग २- सर्वसाधारण १ , सवणस प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री १ , खोपी प्रभाग ३ - नामाप्र स्त्री १ , वावेतर्फ नातू प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, कळंबणी खुर्द प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री १ व प्रभाग २- अनुसूचित जमाती १ , हुंबरी प्रभाग २ अनुसूचित जमाती १, नांदीवली प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री १ , आंजनी प्रभाग २- सर्वसाधारण१, तळवटपाल प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री २ , प्रभाग - २ अनुसूचित जाती १ व अनुसूचित जाती स्त्री १, वावेतर्फ खेड प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १ , धामनंद प्रभाग १ - अनुसूचित जमाती १, प्रभाग ३- अनुसूचित जाती १ साखर प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, सापिर्ली प्रभाग ३- सर्वसाधारण स्त्री १, सोनगाव प्रभाग ३- नामाप्र १, मुरडे प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, कर्जी प्रभाग १- सर्वसाधारण १, प्रभाग -२ नामाप्र १ व प्रभाग ३- नामाप्र स्त्री १, तुंबाडप्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, पन्हाळजे प्रभाग १- सर्वसाधारण स्त्री २, प्रभाग २- नामाप्र १ व सर्वसाधारण१, मेटे प्रभाग ३- सर्वसाधारण स्त्री १, कावळे प्रभाग २- सर्वसाधारण स्त्री १, कर्टेल प्रभाग १- सर्वसाधारण १ व प्रभाग ३- नामाप्र स्त्री १, चिंचघर प्रभाग ४- सर्वसाधारण १ व घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या प्रभाग ४ सर्वसाधारण स्त्री १ आदींचा समावेश आहे. पोटनिवडणुकीची अधिसूचना २२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या मुदतीत नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आहे. तर दिनांक ९ डिसेंबर सायंकाळी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत आवश्यक ठिकाणी मतदान घेण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होतील. राज्यात ४५५४ ग्रामपंचायतीमध्ये ७१३० रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक होत असून जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतीच्या २७५ पदांसाठी पोटनिवडणुकीत मतदान होणार आहे. या निवडणुकी कार्यक्रमा दरम्यान कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
No comments