५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता अटकेत
रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीच्या बिलाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खेड पंचायतीमध्ये शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत गमरे याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या नोंदणीकृत ठेकेदाराला मंडणगड तालुक्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती व प्राथमिक केंद्र अद्यावत करण्याचा ठेका मिळाला होता. ठेकेदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कंत्राटी अभियंता चंद्रकांत गमरे याने ठेकेदाराकडे कामाच्या एकूण रकमेच्या दोन टक्के म्हणजे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती.
ठेकेदार यांनी या बाबत ाचलुचपत खाते रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी भरणे नाका परिसरात सापळा रचला होता. या ठिकाणी ठेकेदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेत असतानाच अधिकाऱ्यांनी गमरे याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण ताटे, सपोनी संदीप ओगले, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास संपर्क –
पोलीस उप-अधीक्षक, सुशांत चव्हाण (9823233044), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी.
कार्यालय संपर्क क्र. – 02352-222893
टोल फ्री क्रं. – 1064
मेल-acbratnagiri@gmail.com
No comments