लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापिठात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

माणगांव : लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापिठाच्या प्रांगणात शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे उच्च व तंञशिक्षण मंत्री ना.उदय सांमंत यांच्या हस्ते झाले. या वेळी रायगडच्या पालकमंञी अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, उच्च व तंञशिक्षण विभागाचे प्रधानसचिव विकासचंद्र रस्तोगी, तंञशिक्षण संचालनालयाचे संचालक डाँ.अभय वाघ, जिल्हाधिकारी डाँ.महेंद्र कल्याणकर, कुलगुरू डाँ.अनिरूध्द पंडीत,कुलसचिव डाँ.भगवान जोगी, उप कुलसचिव विकास गायकवाड, विद्यापिठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.