विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार

मुंबई :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईतच होणार असल्याचे समजते. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख निश्चित झालेली नाही.
 22 ते 29 डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन मुंबईत घेण्याची सरकारची तयारी सुरू आहे. सोमवारी होणाऱ्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या तारखा निश्चित होतील. हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून होणार होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते लांबणीवर पडले. शिवसेना सुरुवातीपासूनच हिवाळी अधिवेशन मुंबई  मध्ये घ्यावे यासाठी आग्रही होती. तर काँग्रेस आणि भाजपचा अधिवेशन नागपूरलाच व्हावे असा आग्रह होता. अखेरीस हे अधिवेशन मुंबई येथे होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

No comments

Powered by Blogger.