रायगड जिल्ह्यात थंडीची चाहूल
पेण : रायगड जिल्ह्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारपासून दात धुके पडू लागले आहे. धुक्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा वेग पहाटेच्या वेळेस मंदावू लागला आहे.
गुरुवारी सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहने चालवतांना अडथळे येत होते. सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्याचे प्रमाण एवढे होते की, वाहनचालकांना वाहन चालवतांना समोरचे ७ ते ८ फुट अंतरावरील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करुन ठेवली होती. काही वेळाने धुक्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरच पुन्हा वाहतूक सुरू केली.
No comments