दापोलीच्या माजी उपनगराध्यक्षा संचिता जोशी शिवसेनेत
यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटीका दिप्ती निखार्गे, शिवसेना दापोली शहर प्रमुख राजेंद्र पेठकर, माजी नगरसेवक सचिन जाधव, दापोली शहर युवती अधिकारी कीर्ती परांजपे, मंगेश गावडे, खेड पंचायत समितीच्या सभापती मानसी महेश जगदाळे, सतिश उर्फ पप्पू चिकणे आदी उपस्थित होते.
आमदार योगेश कदमांचे नेतृत्वच दापोली शहराचा विकास करू शकते अशी आपली धारणा झाली आहे त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करून आपण शिवसेनेची कास धरत आहोत, असे स्पष्ट करत त्यांनी शिवसेना नेते राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम तसेच आम. योगेश कदम यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकत्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
No comments