दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांचा राजीनामा

दापोली :  नगराध्यक्षा परवीन शेख यांनी मंगळवारी  आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. 

येत्या दोन दिवसांमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. 

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यंदा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वार्ड क्रमांक 2 मध्ये त्या निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. अहमदनगर असं या वॉर्डाचे नाव आहे. ओबीसी महिला  आरक्षण या वॉर्डामध्ये पडले आहे.

त्यांच्यासमोर पुन्हा एकदा संचिता जोशी शिवसेनेकडून असण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा दोघी एकमेकांविरोधात लढल्या होत्या. पण त्यावेळेला परवीन शेख या शिवसेनेमध्ये होत्या आणि संचिता जोशी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या.

या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार हे येत्या 22 डिसेंबर रोजी स्पष्ट होईल. 

No comments

Powered by Blogger.