जगबुडी नदीत मृतावस्थेत मगर आढळली

खेड : खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये भोस्ते पुलानजिक गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक मगर मृतावस्थेत आढळून आली. यामुळे जगबुडीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  मागील दोन वर्षात अशाच प्रकारे तीन मगरींचा मृत्यू झाला असून मगरीचे मृत्यू नेमके कशामुळे होतायत हा एक चिंतेचा विषय ठरला आहे. मगर मृतावस्थेत आढळल्यानंतर नागरिकांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले  अधिकाऱ्यांनी  घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जगबुडी नदीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मगरींचा वावर आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून  मगरीच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आंहे, याचे कारण शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.

No comments

Powered by Blogger.