घाणेखुंट येथे आठ लाख रुपयांचा गुटखा जप्त!; एक अटकेत
खेड : खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे 2 डिसेंबर रोजी खेड पोलिसांनी एका गोदामावर धाड घालून 8 लाख 640 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तय्यब सत्तार मेमन (वय 39 वर्षे, राहणार गवळी वाडी, घाणेखुंट, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) याच्या गोदामांमध्ये अवैध गुटख्याचा साठा असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 डिसेंबर रोजी 8 वाजून 10 मिनिटाचे सुमारास सदर गोदामावर छापा घातला. त्यावेळी तेथे आर एम डी आणि विमल या गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. त्याची एकंदर किंमत सुमारे 8 लाख 640 रुपये इतकी आहे तय्यब मेमन याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुचित गडदे, परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, ए एस आय घाणेकर, पोलीस शिपाई संकेत गुरव, विनायक येलकर, रुपेश पेढामकर यांच्या पथकाने केली
No comments