मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा एक डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईत किरकोळ अपघात झाल्याचे वृत्त आहे.
एका कार्यक्रमाला जात असताना नामदार सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ती गाडी सामंत यांच्या गाडीवर आदळली आपल्या गाडीत सामंत एकटेच होते त्यांना या अपघातात किरकोळ मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. या अपघातात त्यांचे सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
No comments