Ratnagiri : कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात २-३ ठिकाणी दरडी कोसळल्या

: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात () . या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, केवळ हलकी वाहने या मार्गावरून जात आहेत. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. () कोकण-पश्चिम महाराष्ट्राला () जोडणारा हा मार्ग असून, या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. ( Landslide) सोमवारी रात्री उशिरा या दरडी कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी सकाळी या घाटात दरडी कोसळल्याचे दिसून आले. तब्बल दोन ते तीन ठिकाणी या दरडी कोसळल्या होत्या. दगड आणि मातीचा ढिगारा मार्गावर आला होता. घाटातील मार्गावर कोसळलेल्या माती आणि दगडांचा ढिगारा बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. राजापूर बांधकाम उपविभागाकडून माती आणि दगड बाजूला हटवण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा घाटमार्ग असल्याने मोठा फटका बसला आहे. सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, केवळ हलकी वाहने या घाटमार्गातून जात आहेत. दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता सोमवारी रात्री उशिरा दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी याबाबत माहिती मिळाली. या घाटमार्गावर दोन ते तीन ठिकाणी दरड कोसळून माती आणि दगडांचा ढिगारा रस्त्यावर आला होता. खबरदारी म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर एकेरी वाहतूक सुरू असली तरी, फक्त हलकी वाहने येथून जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर उपविभागाकडून तात्काळ ढिगारा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज दुपारपर्यंत काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. आंबा घाटातून वाहतुकीसाठी जड व अवजड वाहनांवर मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक वाहने अणुस्कुरा घाटाचा वापर करतात. परंतु येथेही दरडी कोसळल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3oQLVYf
https://ift.tt/3GHcwNx

No comments

Powered by Blogger.